Posts

CPR म्हणजे नेमकं काय असतं?

Image
       एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यानं किंवा डॉक्टरनं आपात्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णाच्या छातीवर दाब देऊन किंवा तोंडानं श्वास देऊन जीव वाचवल्याचं तुम्ही पाहिलं असेल. यालाच सीपीआर (CPR) असं म्हटलं जातं.       कार्डिओ पल्मोनरी रीससिटेशन (Cardiopulmonary resuscitation) याचं संक्षिप्त रुप म्हणजे सीपीआर (CPR) होय. एखाद्या आपत्कालीन स्थितीत व्यक्तीला किंवा प्राण्याला जिवंत ठेवण्यासाठी वापरली जाणारी उपचार पद्धती आहे. जेव्हा एखादी व्यक्ती श्वास (Breathe ) घेणं थांबवते तेव्हा ती बेशुद्ध पडते. अशावेळी त्या व्यक्तीची छाती दाबली जाते. ज्यामुळे शरीरातील रक्तात आधीपासून उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा त्याच्या पूर्ण शरीराला केला जातो. यामुळे व्यक्तीला काही काळ जिवंत ( Live ) ठेवायला मदत होते.आपत्कालीन वैद्यकीय ( Medical Emergency ) परिस्थितीमध्ये तातडीचे उपचार म्हणून सीपीआरचा वापर केला जातो. सीपीआर का महत्वाचा आहे? Why is CPR important?    जर रक्त प्रवाह थांबला तर काही मिनिटांत मेंदूला कायमचे नुकसान होऊ शकते किंवा मृत्यू ह...

हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी काय करावे ?

Image
              हृदयरोग (Heart Disease) सर्वात जास्त मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे. हे अपंगत्वाचेही एक प्रमुख कारण आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्या हृदयविकारचा धोका वाढवू शकतात. त्यांना जोखीमचे घटक (Risk Factor) म्हणतात. त्यापैकी काही तुम्ही नियंत्रित करू शकत नाही (  Non-Controlled ), परंतु असे बरेच आहेत जे तुम्ही नियंत्रित करू शकता ( Controlled ). त्यांच्याबद्दल जाणून घेतल्यास हृदयविकारचा धोका कमी होऊ शकतो. आपण बदलू शकत नाहीत असे काही जोखमीचे घटक : 1. वय : Age          जसजसे तुमचे वय वाढत जाते तसतसे तुम्हाला हृदयविकारचा धोका वाढत जातो. वय ४५ आणि त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना आणि ५५ आणि त्याहून अधिक वयाच्या स्त्रियांना जास्त धोका असतो. 2. सेक्स : Sex        काही जोखीम घटक पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हृदयविकाराच्या जोखमीवर वेगळ्या प्रकारे परिणाम करू शकतात. उदाहरणार्थ, इस्ट्रोजेन ( Estrogen ) स्त्रियांना हृदयविकारापासून काही प्रमाणात संरक्षण देते, परंतु मधुमेहामुळे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हृदयव...

मधुमेह म्हणजे नेमकं काय? मधुमेहाची लक्षणे? त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं?

Image
  बदलेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहारांमुळे मधुमेह रुग्णांच्या संख्येत जास्त प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. मधुमेह म्हणजे नक्की काय ?        मधुमेह हा अनेक लक्षणांचा समुह ( Syndrome ) आहे. आपल्या शरीरातील रक्तामध्ये साखरेचे प्रमाण एका विशिष्ट प्रमाणात असते. पण काही कारणामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले तर आपल्याला मधुमेह होतो. मधुमेह का होतो ?        याच्यामध्ये आपल्या शरीरातील कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन यांच्या चयापचाय ( Metabolism ) प्रक्रियेमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे होतो. हा बिघाड शरीरात इन्सुलिनचे ( Insulin ) प्रमाण कमी झाल्यामुळे किंवा इन्सुलिनची ऊतीला ( Tissue ) असलेली संवेदनशीलता ( Sensitivity) कमी झाल्यामुळे होते. मधुमेहाचे प्रकार टाईप-१-मधुमेह टाईप-२-मधुमेह गरोदरपणातील मधुमेह १. टाईप-१-मधुमेह हा आपल्या शरीरातील स्वादुपिंडाच्या बीटा ( Beta Cells ) पेशीला खराब झाल्यामुळे होतो. या पेशी आपल्या शरीरात इन्सुलिनची निर्मिती करत असतात. या पेशी विषाणूजन्य आजार ( Viral Infections ) किंव...

कोरोना लसीच्या बूस्टर डोससाठी नोंदणी !

Image
१. केंद्र सरकारने केलेल्या घोषणेनुसार, देशभरात बूस्टर डोस देण्यात येणार आहे. २. या बूस्टर डोससाठी CoWin वर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही , असेही केंद्राने म्हटले आहे. ३. १० जानेवारीपासून लाभार्थ्यांना कोरोनाच्या लसीचा बूस्टर डोस दिला जाणार आहे. ४. सध्या तरी लसीचा बूस्टर डोस हा हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्ष वयाच्या पुढील नागरिकांसाठी असेल. ५. बूस्टर डोस घेण्यासाठी दुसरा डोस घेऊन ९ महिने किंवा ३९ आठवडे झालेले असावेत. ६.  ज्या लसीचे दोन डोस पूर्वी घेतले असतील, त्याच लसीचा बूस्टर डोस दिला जावा , असे केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचित केले आहे. ७. बूस्टर डोस घेण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज पडणार नाही. तरी जे पात्र असतील त्यांनी कोरोनाच्या बूस्टर डोस घ्यावा.

गृह विलगीकरणाचे नवे नियम काय आहेत?

Image
  लक्षणं नसलेले रुग्ण कोण? कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह रक्तातली ऑक्सिजन पातळी 93 टक्क्यांपेक्षा जास्त सौम्य लक्षणांचे रुग्ण कोण? कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह घशात त्रास, पण श्वास घ्यायला त्रास नसणे ताप असू वा नसू शकतो रक्तातली ऑक्सिजन पातळी 93% पेक्षा जास्त गृह विलगीकरण कोणी करावे? सौम्य लक्षणं असलेल्या किंवा कोणतीही लक्षणं नसलेल्यांनाच गृह विलगीकरणाची मुभा असेल. मधुमेह, कर्करोग, हृदयरोगासारख्या सहव्याधी असलेल्या ६० वर्षांवरील रुग्णांचं डॉक्टरच्या परवानगीनेच गृह विलगीकरण. गृह विलगीकरण कसे करावे? रुग्णासाठी घरातच वेगळी, हवेशीर खोली असायला हवी. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीनेच रुग्णाची देखभाल करावी. देखभाल करणाऱ्या व्यक्तीने डॉक्टरांशी नियमित संपर्कात राहावं. गृह विलगीकरणातील व्यक्तींनी काय करावे? रुग्णाने 3- पदरी मेडिकल मास्क वापरावा, जास्तीत जास्त 8 तास वापरून फेकावा. रुग्णाने संतुलित आहार घ्यावा, पुरेसा आराम करावा आणि वेळोवेळी ऑक्सिजनची पातळी तपासावी. किमान 40 सेकंद साबणाने वा सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे. रुग्णांनी घरी गरम पाण्याच्या गुळण्या कराव्या किंवा दिवसातून 3 वेळा वाफ घ्यावी. ...