CPR म्हणजे नेमकं काय असतं?

     

CPR म्हणजे नेमकं काय असतं? What is CPR?

एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यानं किंवा डॉक्टरनं आपात्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णाच्या छातीवर दाब देऊन किंवा तोंडानं श्वास देऊन जीव वाचवल्याचं तुम्ही पाहिलं असेल. यालाच सीपीआर (CPR) असं म्हटलं जातं.

      कार्डिओ पल्मोनरी रीससिटेशन (Cardiopulmonary resuscitation) याचं संक्षिप्त रुप म्हणजे सीपीआर (CPR) होय. एखाद्या आपत्कालीन स्थितीत व्यक्तीला किंवा प्राण्याला जिवंत ठेवण्यासाठी वापरली जाणारी उपचार पद्धती आहे. जेव्हा एखादी व्यक्ती श्वास (Breathe ) घेणं थांबवते तेव्हा ती बेशुद्ध पडते. अशावेळी त्या व्यक्तीची छाती दाबली जाते. ज्यामुळे शरीरातील रक्तात आधीपासून उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा त्याच्या पूर्ण शरीराला केला जातो. यामुळे व्यक्तीला काही काळ जिवंत ( Live ) ठेवायला मदत होते.आपत्कालीन वैद्यकीय ( Medical Emergency ) परिस्थितीमध्ये तातडीचे उपचार म्हणून सीपीआरचा वापर केला जातो.


सीपीआर का महत्वाचा आहे? Why is CPR important?


   जर रक्त प्रवाह थांबला तर काही मिनिटांत मेंदूला कायमचे नुकसान होऊ शकते किंवा मृत्यू होऊ शकतो. म्हणून, प्रशिक्षित वैद्यकीय मदत येईपर्यंत रक्त प्रवाह आणि श्वासोच्छ्वास चालू ठेवणे अत्यंत महत्वाचे असते. 108 आपत्कालीन ऑपरेटर किंवा स्थानिक आपत्कालीन क्रमांक ( Emergency Helpline ) वर संपर्क केल्यावर ते तुम्हाला मार्गदर्शन करतात.


सीपीआर कधी देण्यात येतो? When is CPR given?


          एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध पडल्यानंतर त्याचा श्वास घेणे थांबते. त्यावेळी ही उपचार पद्धती उपयोगाची ठरते.

  • एखादी व्यक्तीला अचानक विजेचा धक्का ( Electrical Shock ) बसल्यावर,
  • अपघातामध्ये ( Accident ) गंभीर दुखापत होऊन बेशुद्ध झाल्यावर,
  • पोहताना कुणी बुडालं तर त्याच्या फुफ्फुसामध्ये गेलेले पाणी काढण्यासाठी,
  • फुप्फुसामध्ये ( Lung ) खूप धूर जमा झाल्यानं ती व्यक्ती बेशुद्ध पडली अथवा त्याला श्वास घेण्यास त्रास झाला.

           तर सीपीआर देण्यात येतो.



सीपीआर देण्यासाठी कोणते साहित्य लागते? What materials are required for CPR?


        सीपीआर देण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या औषधाची ( Medicine )  किंवा इंजेक्शन ( Injection ) गरज भासत नाही. ज्या व्यक्तीचा श्वास गुदमरला आहे किंवा हृदयाची गती मंदावली आहे, ती पूर्ववत होईपर्यंत छातीवर दाब ( Chest Compression ) दिला जातो. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सामान्य होण्यास मदत होते. याशिवाय सीपीआरमध्ये रुग्णाला तोंडानंही श्वास दिला जातो. सीपीआर देण्याची एक विशिष्ट पद्धत असते. जिचा वापर करून अनेकांचा जीव वाचवता येऊ शकतो. काहीवेळा अपघातात तोंडाला जखम झाली तर तोंडातून श्वास देता येत नाही, अशा परिस्थितीत नाकातूनही श्वास दिला जातो. यामुळे त्या व्यक्ती किंवा रुग्णाच्या फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहचतो. यामुळे शरीरात अगोदरच असलेल्या ऑक्सिजनमिश्रित रक्ताला चालना मिळते.



सीपीआरमुळे काय होतं? What happens due to CPR?


या प्रक्रियेचा शरीरावर काय परिणाम होतो हे आपण समजून घेऊया. जर एखाद्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास ( Breathing )  किंवा हृदयाचे ठोके ( Heart Beat ) बंद झाले असतील, तर पुरेशा ऑक्सिजनअभावी तिच्या शरीरातील पेशी मृत होऊ लागतात. या गोष्टीचा व्यक्तीच्या मेंदूवर परिणाम होतो. यामुळे काहीवेळा व्यक्तीचा मृत्युदेखील होतो. अशा परिस्थितीत सीपीआर दिल्यास जीव वाचू शकतो. सीपीआर ही साधीसोपी आपत्कालीन उपचार प्रक्रिया आहे. मात्र, त्यासाठी बेसिक प्रशिक्षणाची ( Training ) आवश्यकता आहे. त्या व्यक्तीला सीपीआरची गरज आहे की नाही हे लक्षात येणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही प्रशिक्षित असाल तरच त्याचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. सीपीआर कसा द्यायचा हे माहीत असल्यास संकटकाळी एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवता येतो.




सीपीआर देण्याची पद्धत काय? What is the procedure?


लहान मुलांसाठी आणि मोठ्या व्यक्तींसाठी सीपीआर उपचाराची पद्धत ही वेगळी आहे. मुल अगदी लहान असेल तर त्याला दोन बोटांच्या किंवा तोंडाच्या साह्याने हळू-हळू श्वास दिला जातो. यामुळे ते मुल लवकर शुद्धीवर येण्यास मदत होते.


प्रौढ ( Adult ) व्यक्तीला सीपीआर देण्याची पद्धत ही वेगळी आहे.  प्रौढ व्यक्तींना हे उपचार करण्यापूर्वी त्यांना सफाट जमिनीवर झोपवले जाते. त्यानंतर त्याची छाती दाबली जाते. तसेच त्याचे डोके खाली राहील या पद्धतीने त्याची छाती जमिनीपासून वर उचलण्यात येते. त्यामुळे देखील त्याच्या  शरीरातील रक्तात आधीपासून उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा मिळतो.


( या विषयी सविस्तर माहिती पुढील लेखामध्ये )



सीपीआर देताना घेण्याची खबरदारी : Precautions to be taken while giving CPR


कोणताही व्यक्ती बेशुद्ध पडला तर त्याला सीपीआर दिला जातो असे नाही. सीपीआर देण्यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक असते. सीपीआर देण्यापूर्वी त्या व्यक्तीला श्वास घेता येईल या ठिकाणी झोपवले पाहिजे. तसेच त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटे सोडू नये. सीपीआर देणाऱ्या व्यक्तीला यामध्ये तज्ज्ञ असेल तरच हे उपचार द्यावेत, अन्यथा हे धोकादायक ठरु शकते. त्याचबरोबर सीपीआरचा उपयोग हा ती व्यक्ती काही काळ जीवंत राहण्यासाठी आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला लवकरात लवकर पुढील उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करणे आवश्यक आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मानसिक आरोग्य: ताणतणाव आणि चिंता यावर मात कशी करावी?

नियमित आरोग्य तपासणी का गरजेची आहे?

HbA1c म्हणजे काय? | मधुमेहींसाठी सर्वात महत्त्वाची चाचणी | Info Plexus