कोरोना लसीमुळे 'या' आजारांपासून मिळते संरक्षण !
कोरोना लसीमुळे तुमचे केवळ कोरोनापासूनच नाही तर त्याशिवायही इतर काही आजारांपासून संरक्षण होते, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं लसीकरणाचे फायदे सांगितले आहेत. सध्या वेगवेगळ्या आजारांवर लस उपलब्ध आहे. लसीमुळे आजारांपासून संरक्षण मिळते, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. लस घेतल्यामुळे संरक्षण होणाऱ्या वीसहून अधिक आजारांची यादी व्हॅक्सिन वर्क #VaccineWorks या हॅशटॅगसह जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केली आहे. त्यामुळे लस घेण्यास घाबरु नका, कोणतेही गैरसमज बाळगू नका आणि लवकरात लवकर लसीकरण करावे, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. 1. हिपॅटायटीस बी ( Hepatitis B ) हिपॅटायटिस विषाणू ने पसरणार असं इन्फेक्शन आहे जे थेट लिव्हरला प्रभावित करतं. सामान्यपणे हे पाच प्रकारचं असत. यांना ए, बी, सी, डी आणि ई म्हटलं जात. सध्या जगभरात सर्वात जास्त लोक हेपेटायटिस-बी आणि हेपेटायटिस-सी चे शिकार आहेत. हेपेटायटिस बी एचआयव्हीच्या तुलनेत ५० ते १०० टक्के अधिक घातक असतो. कारण हिपॅटायटिस-बी चा विषाणू शरीराच्या बाहेरही कमीत कमी सात दिवसांपर्यंत जिवंत राहून न...