Posts

Showing posts with the label Covid-19 / कोविड-१९

१८ वर्षांवरील व्यक्तींना कोविड-१९ चा बूस्टर डोस

Image
  कोव्हिडवरील लशीचा दुसरा डोस घेतल्याला 9 महिने पूर्ण झाल्यानंतरच बूस्टर डोस घेता येणार आहे. हा बूस्टर डोस केवळ खासगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल, अशीही माहिती केंद्रीय मंत्रालयानं दिलीय. सध्या सरकारी लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 हून अधिक वय वर्षं असलेल्या व्यक्तींना बूस्टर डोस देण्यात येत आहे आणि ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. तुम्ही एक तर थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकता किंवा कोविन ॲपवर नोंदणी करून जाऊ शकता. पण प्रत्येक लसीकरणाची नोंद कोविन ॲपवर होणं गरजेचं आहे. ही सुविधा रविवार १० एप्रिल २०२२ पासून खाजगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होईल. जे पात्र असतील त्यांनी आपला कोविड-१९ लसीचा बूस्टर डोस घ्यावा

कोरोना लसीमुळे 'या' आजारांपासून मिळते संरक्षण !

Image
  कोरोना लसीमुळे तुमचे केवळ कोरोनापासूनच नाही तर त्याशिवायही इतर काही आजारांपासून संरक्षण होते, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं लसीकरणाचे फायदे सांगितले आहेत. सध्या वेगवेगळ्या आजारांवर लस उपलब्ध आहे. लसीमुळे आजारांपासून संरक्षण मिळते, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. लस घेतल्यामुळे संरक्षण होणाऱ्या वीसहून अधिक आजारांची यादी व्हॅक्सिन वर्क #VaccineWorks या हॅशटॅगसह जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केली आहे. त्यामुळे लस घेण्यास घाबरु नका, कोणतेही गैरसमज बाळगू नका आणि लवकरात लवकर लसीकरण करावे, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. 1. हिपॅटायटीस बी ( Hepatitis B ) हिपॅटायटिस विषाणू ने पसरणार असं इन्फेक्शन आहे जे थेट लिव्हरला प्रभावित करतं. सामान्यपणे हे पाच प्रकारचं असत. यांना ए, बी, सी, डी आणि ई म्हटलं जात. सध्या जगभरात सर्वात जास्त लोक हेपेटायटिस-बी आणि हेपेटायटिस-सी चे शिकार आहेत. हेपेटायटिस बी एचआयव्हीच्या तुलनेत ५० ते १०० टक्के अधिक घातक असतो. कारण हिपॅटायटिस-बी चा विषाणू शरीराच्या बाहेरही कमीत कमी सात दिवसांपर्यंत जिवंत राहून न...

कोरोना लसीच्या बूस्टर डोससाठी नोंदणी !

Image
१. केंद्र सरकारने केलेल्या घोषणेनुसार, देशभरात बूस्टर डोस देण्यात येणार आहे. २. या बूस्टर डोससाठी CoWin वर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही , असेही केंद्राने म्हटले आहे. ३. १० जानेवारीपासून लाभार्थ्यांना कोरोनाच्या लसीचा बूस्टर डोस दिला जाणार आहे. ४. सध्या तरी लसीचा बूस्टर डोस हा हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्ष वयाच्या पुढील नागरिकांसाठी असेल. ५. बूस्टर डोस घेण्यासाठी दुसरा डोस घेऊन ९ महिने किंवा ३९ आठवडे झालेले असावेत. ६.  ज्या लसीचे दोन डोस पूर्वी घेतले असतील, त्याच लसीचा बूस्टर डोस दिला जावा , असे केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचित केले आहे. ७. बूस्टर डोस घेण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज पडणार नाही. तरी जे पात्र असतील त्यांनी कोरोनाच्या बूस्टर डोस घ्यावा.

गृह विलगीकरणाचे नवे नियम काय आहेत?

Image
  लक्षणं नसलेले रुग्ण कोण? कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह रक्तातली ऑक्सिजन पातळी 93 टक्क्यांपेक्षा जास्त सौम्य लक्षणांचे रुग्ण कोण? कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह घशात त्रास, पण श्वास घ्यायला त्रास नसणे ताप असू वा नसू शकतो रक्तातली ऑक्सिजन पातळी 93% पेक्षा जास्त गृह विलगीकरण कोणी करावे? सौम्य लक्षणं असलेल्या किंवा कोणतीही लक्षणं नसलेल्यांनाच गृह विलगीकरणाची मुभा असेल. मधुमेह, कर्करोग, हृदयरोगासारख्या सहव्याधी असलेल्या ६० वर्षांवरील रुग्णांचं डॉक्टरच्या परवानगीनेच गृह विलगीकरण. गृह विलगीकरण कसे करावे? रुग्णासाठी घरातच वेगळी, हवेशीर खोली असायला हवी. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीनेच रुग्णाची देखभाल करावी. देखभाल करणाऱ्या व्यक्तीने डॉक्टरांशी नियमित संपर्कात राहावं. गृह विलगीकरणातील व्यक्तींनी काय करावे? रुग्णाने 3- पदरी मेडिकल मास्क वापरावा, जास्तीत जास्त 8 तास वापरून फेकावा. रुग्णाने संतुलित आहार घ्यावा, पुरेसा आराम करावा आणि वेळोवेळी ऑक्सिजनची पातळी तपासावी. किमान 40 सेकंद साबणाने वा सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे. रुग्णांनी घरी गरम पाण्याच्या गुळण्या कराव्या किंवा दिवसातून 3 वेळा वाफ घ्यावी. ...