गृह विलगीकरणाचे नवे नियम काय आहेत?

गृह विलगीकरणाचे नवे नियम काय आहेत?

 लक्षणं नसलेले रुग्ण कोण?

  • कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह

  • रक्तातली ऑक्सिजन पातळी 93 टक्क्यांपेक्षा जास्त


सौम्य लक्षणांचे रुग्ण कोण?

  • कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह

  • घशात त्रास, पण श्वास घ्यायला त्रास नसणे

  • ताप असू वा नसू शकतो

  • रक्तातली ऑक्सिजन पातळी 93% पेक्षा जास्त


गृह विलगीकरण कोणी करावे?

  • सौम्य लक्षणं असलेल्या किंवा कोणतीही लक्षणं नसलेल्यांनाच गृह विलगीकरणाची मुभा असेल.

  • मधुमेह, कर्करोग, हृदयरोगासारख्या सहव्याधी असलेल्या ६० वर्षांवरील रुग्णांचं डॉक्टरच्या परवानगीनेच गृह विलगीकरण.


गृह विलगीकरण कसे करावे?

  • रुग्णासाठी घरातच वेगळी, हवेशीर खोली असायला हवी.

  • लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीनेच रुग्णाची देखभाल करावी.

  • देखभाल करणाऱ्या व्यक्तीने डॉक्टरांशी नियमित संपर्कात राहावं.


गृह विलगीकरणातील व्यक्तींनी काय करावे?

  • रुग्णाने 3- पदरी मेडिकल मास्क वापरावा, जास्तीत जास्त 8 तास वापरून फेकावा.

  • रुग्णाने संतुलित आहार घ्यावा, पुरेसा आराम करावा आणि वेळोवेळी ऑक्सिजनची पातळी तपासावी.

  • किमान 40 सेकंद साबणाने वा सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे.

  • रुग्णांनी घरी गरम पाण्याच्या गुळण्या कराव्या किंवा दिवसातून 3 वेळा वाफ घ्यावी.

  • ताप उतरत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने दिवसातून 4 वेळा पॅरासिटामॉल 650mg गोळी घ्यावी.

  • डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय चेस्ट X - रे, रक्त तपासणी आणि CT स्कॅन करू नका.

  • स्वतःवर औषधाचे प्रयोग करू नका.



देखभाल करणाऱ्या व्यक्तीने काय करावे?

  • देखभाल करणाऱ्या व्यक्तीने N95 मास्क घालूनच खोलीत प्रवेश करावा.

  • रुग्णाची भांडी घरातील इतर लोकांनी वापरू नये, रुग्णाचा घरातील इतर साहित्याशी संपर्क टाळावा.

  • किमान 40 सेकंद साबणाने वा सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे.


खालीलपैकी काही जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या !

  • श्वास घ्यायला त्रास होत असेल...

  • ऑक्सिजन पातळी (SpO2 ) 93% पेक्षा खाली आली तर...

  • छातीत दुखत असेल तर…

  • जर 100°F पेक्षा जास्त ताप सलग 3 दिवस असेल...

  • थकवा, गोंधळल्यासारखं वाटत असेल...




Comments

Popular posts from this blog

मानसिक आरोग्य: ताणतणाव आणि चिंता यावर मात कशी करावी?

नियमित आरोग्य तपासणी का गरजेची आहे?

HbA1c म्हणजे काय? | मधुमेहींसाठी सर्वात महत्त्वाची चाचणी | Info Plexus