मधुमेह म्हणजे नेमकं काय? मधुमेहाची लक्षणे? त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं?
बदलेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहारांमुळे मधुमेह रुग्णांच्या संख्येत जास्त प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.
मधुमेह म्हणजे नक्की काय ?
मधुमेह हा अनेक लक्षणांचा समुह ( Syndrome ) आहे. आपल्या शरीरातील रक्तामध्ये साखरेचे प्रमाण एका विशिष्ट प्रमाणात असते. पण काही कारणामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले तर आपल्याला मधुमेह होतो.
मधुमेह का होतो ?
याच्यामध्ये आपल्या शरीरातील कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन यांच्या चयापचाय ( Metabolism ) प्रक्रियेमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे होतो. हा बिघाड शरीरात इन्सुलिनचे ( Insulin ) प्रमाण कमी झाल्यामुळे किंवा इन्सुलिनची ऊतीला ( Tissue ) असलेली संवेदनशीलता ( Sensitivity) कमी झाल्यामुळे होते.
मधुमेहाचे प्रकार
- टाईप-१-मधुमेह
- टाईप-२-मधुमेह
- गरोदरपणातील मधुमेह
१. टाईप-१-मधुमेह
- हा आपल्या शरीरातील स्वादुपिंडाच्या बीटा ( Beta Cells ) पेशीला खराब झाल्यामुळे होतो. या पेशी आपल्या शरीरात इन्सुलिनची निर्मिती करत असतात.
- या पेशी विषाणूजन्य आजार ( Viral Infections ) किंवा स्वयंप्रतिकार रोग ( Autoimmune Disease ) यांच्यामुळे खराब होतात.
- अंदाजे ५-१० % मधुमेहच्या रुग्णांमध्ये हा प्रकार आढळतो. यामध्ये रुग्णाला इन्सुलिन वर अवलंबून राहावे लागते.
- टाईप-१-मधुमेहाची लक्षणे काही आठवडे किंवा महिन्यांत विकसित होऊ शकतात आणि ती गंभीर असू शकतात.
- टाईप-१-मधुमेह सहसा तुम्ही लहान असताना, किशोरवयीन किंवा तरुण प्रौढ असताना सुरू होतो परंतु कोणत्याही वयात होऊ शकतो.
- तसेच ज्यांच्या कुटुंबातील पालक, भाऊ किंवा बहीण यांच्यापैकी कोणाला असला तरी टाईप-१-मधुमेह होण्याचा धोका जास्त आहे.
- सध्या, टाईप-१-मधुमेह कसा टाळावा हे कोणालाही माहिती नाही.
२. टाईप-२-मधुमेह
- या प्रकारचा मधुमेह हा टाईप-1-मधुमेहापेक्षा जास्त प्रमाणात आढळतो. साधारणपणे ९०-९५% ही टाईप-२-मधुमेहाची आहेत.
- टाईप-२ मधुमेहाची लक्षणे विकसित होण्यास अनेक वर्षे लागतात. काही लोकांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
- टाईप-२ मधुमेह सामान्यतः आपण प्रौढ असताना सुरू होतो, जरी अधिकाधिक मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये तो विकसित होत आहे.
- लक्षणे दिसणे कठीण असल्याने, टाईप-२ मधुमेहासाठी जोखीम घटक जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
- आपल्याकडे त्यापैकी काही असल्यास आपल्या डॉक्टरांना भेट देण्याची खात्री करा.
३. गरोदरपणातील मधुमेह
- गरोदरपणातील मधुमेह हा एक प्रकारचा मधुमेह आहे जो गर्भधारणेदरम्यान विकसित होऊ शकतो अशा स्त्रियांमध्ये ज्यांना आधीचा मधुमेह नव्हता.
- गरोदरपणात अनेक स्त्रियांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास या प्रकारचा मधुमेह होतो.
- यावर इन्सुलिन च्या इंजेक्शन दिल्यावर नियंत्रणात ठेवला जाऊ शकतो.
- गरोदरपणात मधुमेह झालेल्या जवळपास ८०% स्त्रियांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नॉर्मल पातळीला बाळाला जन्म दिल्यानंतर येते.
रक्तातील साखरेचे पातळी
१. उपाशीपोटी
- ८०-९० mg/dL या नॉर्मल पातळी मध्ये असते.
- १२६ mg/dL किंवा त्या पेक्षा जास्त असेल तर मधुमेह.
२.जेवण केल्यानंतर
- १४० mg/dL किंवा त्यापेक्षा कमी ही नॉर्मल पातळी आहे.
- २०० mg/dL किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास मधुमेह
मधुमेहाची लक्षणे
- वारंवार लघवीला जावे लागणे
- वारंवार तहान लागल्यासारखे वाटणे
- त्वचा कोरडी पडणे
- अचानकपणे वजन घटणे
- अशक्तपणा, चक्कर येणे
- अधिक भूक लागणे
- हात किंवा पायांत सतत टोचल्याप्रमाणे वाटणे
- डोळ्यांचे विकार, त्वचा विकार होणे
- मुत्रमार्गामध्ये इन्फेक्शन होणे
- जखम भरून येण्यास जास्त कालावधी लागणे
- मळमळ व उलटी होणे
अशी लक्षणे मधुमेह मध्ये जाणवू शकतात.
मधुमेह होण्याचा धोका कोणाला आहे ?
- ज्यांचे वजन जास्त आहे किंवा जास्त लठ्ठपणा आहे
- ज्यांच्या कुटुंबातील पालक, भाऊ किंवा बहीण यांना मधुमेह असेल तर
- शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे किंवा व्यायामाचा अभाव असणे
- गरोदरपणात मधुमेह झालेले
- योग्य किंवा पौष्टीक आहार नसणे
- मानसिक ताणतणाव असणे
- ३.५ किलोग्रॅम पेक्षा जास्त वजनाच्या बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रियांमध्ये योग्य काळजी घेतली नाही तर
मधुमेह होऊ नये म्हणून काय करावे ?
- आरोग्याला पोषक अन्न खा
- वजन नियंत्रित ठेवा
- सक्रिय राहा
- रक्तातील साखर नियंत्रित ठेवा
- नियमितपणे व्यायाम करा
- भरपूर पण आवश्यक तेवढे पानी प्या
- धूम्रपान करणे टाळा
- बैठी जीवनशैली टाळा
- जास्त फायबरयुक्त आहार घ्या
- प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन कमी करा
चांगली माहिती मिळाली, धन्यवाद
ReplyDelete