मधुमेह म्हणजे नेमकं काय? मधुमेहाची लक्षणे? त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं?

 

मधुमेह म्हणजे काय |

बदलेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहारांमुळे मधुमेह रुग्णांच्या संख्येत जास्त प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.


मधुमेह म्हणजे नक्की काय ?


       मधुमेह हा अनेक लक्षणांचा समुह ( Syndrome ) आहे. आपल्या शरीरातील रक्तामध्ये साखरेचे प्रमाण एका विशिष्ट प्रमाणात असते. पण काही कारणामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले तर आपल्याला मधुमेह होतो.


मधुमेह का होतो ?


       याच्यामध्ये आपल्या शरीरातील कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन यांच्या चयापचाय ( Metabolism ) प्रक्रियेमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे होतो. हा बिघाड शरीरात इन्सुलिनचे ( Insulin ) प्रमाण कमी झाल्यामुळे किंवा इन्सुलिनची ऊतीला ( Tissue ) असलेली संवेदनशीलता ( Sensitivity) कमी झाल्यामुळे होते.


मधुमेहाचे प्रकार


  1. टाईप-१-मधुमेह
  2. टाईप-२-मधुमेह
  3. गरोदरपणातील मधुमेह

१. टाईप-१-मधुमेह

  • हा आपल्या शरीरातील स्वादुपिंडाच्या बीटा ( Beta Cells ) पेशीला खराब झाल्यामुळे होतो. या पेशी आपल्या शरीरात इन्सुलिनची निर्मिती करत असतात.
  • या पेशी विषाणूजन्य आजार ( Viral Infections ) किंवा स्वयंप्रतिकार रोग ( Autoimmune Disease ) यांच्यामुळे खराब होतात.
  • अंदाजे ५-१० % मधुमेहच्या रुग्णांमध्ये हा प्रकार आढळतो. यामध्ये रुग्णाला इन्सुलिन वर अवलंबून राहावे लागते.
  • टाईप-१-मधुमेहाची लक्षणे काही आठवडे किंवा महिन्यांत विकसित होऊ शकतात आणि ती गंभीर असू शकतात.
  • टाईप-१-मधुमेह सहसा तुम्ही लहान असताना, किशोरवयीन किंवा तरुण प्रौढ असताना सुरू होतो परंतु कोणत्याही वयात होऊ शकतो.
  • तसेच ज्यांच्या कुटुंबातील पालक, भाऊ किंवा बहीण यांच्यापैकी कोणाला असला तरी टाईप-१-मधुमेह होण्याचा धोका जास्त आहे.
  • सध्या, टाईप-१-मधुमेह कसा टाळावा हे कोणालाही माहिती नाही.


२. टाईप-२-मधुमेह


  • या प्रकारचा मधुमेह हा टाईप-1-मधुमेहापेक्षा जास्त प्रमाणात आढळतो. साधारणपणे ९०-९५% ही टाईप-२-मधुमेहाची आहेत.
  • टाईप-२ मधुमेहाची लक्षणे विकसित होण्यास अनेक वर्षे लागतात. काही लोकांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
  • टाईप-२ मधुमेह सामान्यतः आपण प्रौढ असताना सुरू होतो, जरी अधिकाधिक मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये तो विकसित होत आहे.
  • लक्षणे दिसणे कठीण असल्याने, टाईप-२ मधुमेहासाठी जोखीम घटक जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
  • आपल्याकडे त्यापैकी काही असल्यास आपल्या डॉक्टरांना भेट देण्याची खात्री करा.


३. गरोदरपणातील मधुमेह


  • गरोदरपणातील मधुमेह हा एक प्रकारचा मधुमेह आहे जो गर्भधारणेदरम्यान विकसित होऊ शकतो अशा स्त्रियांमध्ये ज्यांना आधीचा मधुमेह नव्हता.
  • गरोदरपणात अनेक स्त्रियांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास या प्रकारचा मधुमेह होतो.
  • यावर इन्सुलिन च्या इंजेक्शन दिल्यावर नियंत्रणात ठेवला जाऊ शकतो.
  • गरोदरपणात मधुमेह झालेल्या जवळपास ८०% स्त्रियांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नॉर्मल पातळीला बाळाला जन्म दिल्यानंतर येते.


रक्तातील साखरेचे पातळी

    

१. उपाशीपोटी 

  • ८०-९० mg/dL या नॉर्मल पातळी मध्ये असते.
  • १२६ mg/dL किंवा त्या पेक्षा जास्त असेल तर मधुमेह.

२.जेवण केल्यानंतर

  • १४० mg/dL किंवा त्यापेक्षा कमी ही नॉर्मल पातळी आहे.
  • २०० mg/dL किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास मधुमेह


मधुमेहाची लक्षणे

      

  • वारंवार लघवीला जावे लागणे
  • वारंवार तहान लागल्यासारखे वाटणे
  • त्वचा कोरडी पडणे
  • अचानकपणे वजन घटणे
  • अशक्तपणा, चक्कर येणे
  • अधिक भूक लागणे
  • हात किंवा पायांत सतत टोचल्याप्रमाणे वाटणे
  • डोळ्यांचे विकार, त्वचा विकार होणे
  • मुत्रमार्गामध्ये इन्फेक्शन होणे
  • जखम भरून येण्यास जास्त कालावधी लागणे
  • मळमळ व उलटी होणे

 अशी लक्षणे मधुमेह मध्ये जाणवू शकतात.



मधुमेह होण्याचा धोका कोणाला आहे ?


  • ज्यांचे वजन जास्त आहे किंवा जास्त लठ्ठपणा आहे
  • ज्यांच्या कुटुंबातील पालक, भाऊ किंवा बहीण यांना मधुमेह असेल तर
  • शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे किंवा व्यायामाचा अभाव असणे
  • गरोदरपणात मधुमेह झालेले
  • योग्य किंवा पौष्टीक आहार नसणे
  • मानसिक ताणतणाव असणे
  • ३.५ किलोग्रॅम पेक्षा जास्त वजनाच्या बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रियांमध्ये योग्य काळजी घेतली नाही तर


मधुमेह होऊ नये म्हणून काय करावे ?

         

  • आरोग्याला पोषक अन्न खा
  • वजन नियंत्रित ठेवा
  • सक्रिय राहा
  • रक्तातील साखर नियंत्रित ठेवा
  • नियमितपणे व्यायाम करा
  • भरपूर पण आवश्यक तेवढे पानी प्या
  • धूम्रपान करणे टाळा
  • बैठी जीवनशैली टाळा
  • जास्त फायबरयुक्त आहार घ्या
  • प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन कमी करा





Comments

  1. चांगली माहिती मिळाली, धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मानसिक आरोग्य: ताणतणाव आणि चिंता यावर मात कशी करावी?

नियमित आरोग्य तपासणी का गरजेची आहे?

HbA1c म्हणजे काय? | मधुमेहींसाठी सर्वात महत्त्वाची चाचणी | Info Plexus