Posts

घरबसल्या तज्ञ डॉक्टरचा सल्ला आणि उपचार !

Image
                  ई- संजीवनी ऑनलाईन ओपीडी ही कोविडच्या काळात सर्वसामान्यांना वैद्यकीय सल्ला आणि आरोग्य उपचार घ्याता यावा आणि त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होईल या उद्देशाने आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत भारत सरकारने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासाठी तयार केली आहे.         ई-संजीवनी ऑनलाईन ओपीडीच्या आधारे राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील डॉक्टर सोबत संगणक, लॅपटॉप किंवा मोबाईल चा वापर करून कुठल्याही आजारावर वैद्यकीय सल्ला आणि उपचार घेता येतो.         केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या या संयुक्त उपक्रमात ऑनलाईन ओपीडी सोमवार ते रविवार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालू असते तर मध्ये दुपारी १ त २ या वेळेत बंद असते. ही सुविधा पूर्णपणे विनाशुल्क आहे. या सुविधेचा वापर/उपयोग जास्तीत जास्त लोकांनी करून घ्यावा. ई-संजीवनी ऑनलाईन ओपीडी चा वापर कसा करावा ? सर्वप्रथम https://esanjeevaniopd.in या वेबसाईट किंवा प्ले स्टोर...