घरबसल्या तज्ञ डॉक्टरचा सल्ला आणि उपचार !
ई-संजीवनी ऑनलाईन ओपीडी ही कोविडच्या काळात सर्वसामान्यांना वैद्यकीय सल्ला आणि आरोग्य उपचार घ्याता यावा आणि त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होईल या उद्देशाने आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत भारत सरकारने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासाठी तयार केली आहे.
ई-संजीवनी ऑनलाईन ओपीडीच्या आधारे राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील डॉक्टर सोबत संगणक, लॅपटॉप किंवा मोबाईल चा वापर करून कुठल्याही आजारावर वैद्यकीय सल्ला आणि उपचार घेता येतो.
केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या या संयुक्त उपक्रमात ऑनलाईन ओपीडी सोमवार ते रविवार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालू असते तर मध्ये दुपारी १ त २ या वेळेत बंद असते. ही सुविधा पूर्णपणे विनाशुल्क आहे. या सुविधेचा वापर/उपयोग जास्तीत जास्त लोकांनी करून घ्यावा.
ई-संजीवनी ऑनलाईन ओपीडी चा वापर कसा करावा ?
- सर्वप्रथम https://esanjeevaniopd.in या वेबसाईट किंवा प्ले स्टोर मध्ये असलेल्या ई-संजीवनी अँप वर जाऊन 'Patient Registration' या बटनावर दाबावे.
- त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकून राज्य निवडावे आणि तुम्हाला ज्या ओपीडी पाहिजे ती ओपीडी निवडावी आणि 'Send OTP' या बटनावर दाबावे.
- थोडा वेळ थांबल्यानंतर रजिस्टर केलेल्या मोबाईल वर एक OTP येतो, तो टाकल्यानंतर 'OK' या बटनावर दाबावे.
- नंतर स्क्रीनवर दिसणाऱ्या रिकाम्या जागेत आपली माहिती भरावी आणि जर का आपल्याकडे अगोदरचे काही कागदपत्रे असतील तर तिथे अपलोड करावी नंतर 'Generation Token' या बटनावर दाबावे.
- रजिस्टर केलेल्या मोबाईल वर Patient Id आणि Token No चा SMS येतो.
- नंतर Patient Login या बटनावर दाबावे आणि SMS मध्ये आलेला Token No आणि Patient Id टाकून लॉगिन करावे.
- त्यानंतर आपण Waiting वर थांबतो. तिथे Call On वर दाबल्यानंतर तुमचा डॉक्टर सोबत व्हिडिओ कॉल चालू होतो.
- त्यानंतर आपले डॉक्टर सोबत संभाषण झाल्यानंतर आपल्याला एक डिजिटल e-Prescription प्राप्त होईल.
- त्यानंतर आपण मेडिकल मधू गोळ्या-औषधे घेऊ शकता.
अशाप्रकारे आपण General आणि Specility OPD चा सोमवार ते रविवार सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत या सेवेचा वापर करू शकता. दुपारी १ ते २ या कालावधी साठी ही सुविधा बंद असते.
ही सुविधा पूर्णपणे विनाशुल्क आहे.तरी सर्व नागरिकांनी याचा वापर करावा.
Comments
Post a Comment