Posts

मासिक पाळी आरोग्य हा मूलभूत हक्क आहे: सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Image
(Why Menstrual Health Matters: Supreme Court Ruling and Its Impact on Girls’ Education) भारतीय संविधानाच्या कलम 21 अंतर्गत जीवनाचा हक्क म्हणजेच केवळ श्वास घेण्याचा अधिकार नाही, तर सन्मानाने, सुरक्षिततेने आणि आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे. मासिक पाळी ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. तरीही भारतातील अनेक गावांमध्ये आजही मासिक पाळीबाबत लाज, गैरसमज, संकोच, चुकीच्या समजुती आणि अडचणी दिसतात. अनेक मुली आणि महिलांना मासिक पाळीच्या दिवसांत स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक साधने मिळत नाहीत. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय दिला आहे की, मासिक पाळी स्वच्छता (Menstrual Hygiene) हा मूलभूत हक्क असल्याचा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय आहे? सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की मासिक पाळीशी संबंधित स्वच्छता आणि आरोग्य हे महिलांच्या व मुलींच्या जीवनाच्या हक्काचा अविभाज्य भाग आहे. आणि म्हणून मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक सुविधा मिळणे हा प्रत्येक मुलीचा आणि महिलेचा हक्क आहे. त्यामुळे केंद...

महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी: आता प्रत्येक बुधवारी सरकारी रुग्णालयात मिळणार 'मेनॉपॉज'वर मोफत उपचार!

Image
  महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी: आता प्रत्येक बुधवारी सरकारी रुग्णालयात मिळणार 'मेनॉपॉज'वर मोफत उपचार! वयाची ४५ ते ५० वर्षे झाली की स्त्रियांच्या आयुष्यात एक मोठे वळण येते, यामध्ये महिलांच्या शरीरात अनेक नैसर्गिक बदल होत असतात. ज्याला आपण  'मेनॉपॉज' (Menopause)  म्हणतो. अनेक स्त्रिया याला फक्त 'पाळी बंद होणे' समजतात, पण हा केवळ शारीरिक बदल नसून तो मानसिक आरोग्यावरही खोलवर परिणाम करणारा काळ असतो. मात्र, अनेकदा माहितीच्या अभावामुळे किंवा संकोचामुळे महिला या काळात होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करतात. महिलांचे हे आरोग्य लक्षात घेऊन, महाराष्ट्र सरकारने  १४ जानेवारी २०२६  पासून राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये विशेष  'मेनॉपॉज क्लिनिक'  सुरू केले आहेत. अशाप्रकारे महाराष्ट्र सरकारने आता प्रत्येक बुधवारी जिल्हा स्तरावर  विशेष क्लिनिक्स  सुरू करून महिलांना एक हक्काचे व्यासपीठ दिले आहे. हे क्लिनिक नेमके काय आहे? मासिक पाळी कायमची बंद होण्याच्या काळात (आणि त्यानंतरही) महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. या त्रासावर शास्त्रोक...

लहान आतड्यातील जंतूंचा थेट अभ्यास करणारे गिळण्यायोग्य उपकरण विकसित

Image
लहान आतड्यातील जंतूंचा थेट अभ्यास करणारे गिळण्यायोग्य उपकरण विकसित वैद्यकीय विज्ञानाच्या क्षेत्रात भारताने पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण झेप घेतली आहे. आयआयटी दिल्ली आणि एम्स (AIIMS), नवी दिल्ली यांच्या संयुक्त संशोधनातून मानवी आरोग्य समजून घेण्यासाठी एक अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. संशोधकांनी असे गिळण्यायोग्य सूक्ष्म उपकरण (ingestible device) तयार केले आहे, जे थेट लहान आतड्यातील सूक्ष्मजंतूंचे नमुने गोळा करू शकते. ही संकल्पना मानवी शरीरातील “अंतर्गत विश्व” उलगडण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मानवी शरीरातील मायक्रोबायोम: एक अदृश्य पण शक्तिशाली जग मानवी शरीर हे केवळ मानवी पेशींनी बनलेले नाही. संशोधनानुसार, आपल्या शरीरातील सुमारे ४०–५० टक्के पेशी या सूक्ष्मजंतूंच्या असतात. हे जंतू प्रामुख्याने आतड्यांमध्ये वसलेले असतात आणि ते: अन्न पचनात मदत करतात रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात मानसिक आरोग्यावर (mood regulation) परिणाम करतात मधुमेह, लठ्ठपणा, आतड्यांचे आजार यांसारख्या आजारांशी संबंधित असतात मात्र, लहान आतड्यातील जंतूंचा अभ्यास आजपर्यंत मर्यादित राहिला होता. आतड्यांचा अभ्यास क...

नियमित आरोग्य तपासणी का गरजेची आहे?

Image
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपण आरोग्याची काळजी घेण्यापेक्षा आजार झाल्यावरच डॉक्टरांकडे धाव घेतो. पण  “Prevention is Better than Cure”  म्हणजेच प्रतिबंध   उपचारापेक्षा   श्रेष्ठ हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.  नियमित आरोग्य तपासणी (Regular Health Checkup)  आपल्याला आजार वेळेवर ओळखायला मदत करते आणि निरोगी जीवन जगण्यासाठी एक महत्त्वाची पायरी आहे. नियमित आरोग्य तपासणी म्हणजे काय? नियमित आरोग्य तपासणी म्हणजे  विशिष्ट कालावधीनंतर (साधारण ६ महिने ते १ वर्षांनी)  डॉक्टरांकडे जाऊन विविध तपासण्या जस की रक्त तपासण्या, शारीरिक तपासणी, ब्लड प्रेशर, शुगर, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल इ. तपासण्या  यामुळे आपल्याला – आजाराचे सुरुवातीचे लक्षण ओळखता येतात जोखमीचे घटक (risk factors) समजतात योग्य वेळी उपचार सुरू करता येतो  नियमित आरोग्य तपासणीचे फायदे आजाराचे लवकर निदान आणि उपचार  नियमित तपासणीमुळे कोणत्याही आजारपणाची प्रारंभिक लक्षणे ओळखता येतात, त्यामुळे उपचार लवकर सुरू होतात आणि चांगले परिणाम मिळतात.  डायबेटीस, हृदयविकार, थायरॉईड, कर्करोग अशा अनेक आजा...